आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमातून लाभार्थ्याची वैयक्तिक तसेच कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारणे.
लाभार्थ्यांनी मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग स्वयंरोजगार निर्मितीसाठी करणे.
या प्रशिक्षणामार्फत लाभार्थ्यांनी इतर गरजू समाज घटकांची आर्थिक स्थिती सुधारणे.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ :
आर्थिक साक्षरतेच्या प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्यांना ढोबळमानाने खालील नमूद मुद्याबाबत माहिती देण्यात येईल. -
१. भारतातील विविध वित्तीय संस्थांची उदा. भारतीय रिझर्व बँक (RBI), SEBI, इ. माहिती देणे.२. अशा विविध वित्तीय संस्थांची कार्यपद्धतीची माहिती करून देणे.३. वित्तीय संस्थांच्या विविध आर्थिक व्यवहारांची माहिती करून देणे. ४. तसेच वित्तीय संस्थांच्या मार्फत होणारे वेगवेगळे आर्थिक गुंतवणुकीचे उपलब्ध पर्याय उदा. Mutual Funds, SIP, SWP, Stock Market इत्यादी बाबतची माहिती देणे. ५. वेगवेगळे कर्ज प्रकरणे त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि सिबिल स्कोर CIBIL SCORE इत्यादी ची माहिती देणे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
लाभार्थी पात्रता निकष:
१ . 1. अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.२ . अर्जदार पदवी परीक्षा उत्तीर्ण असतील. (किमान पदवीचे शिक्षण चालू असणे अपेक्षित).३ . अर्जदार महाराष्टचा अधिवासी असावा.४ . या कालावधीत उमेदवाराने या योजने सारख्या अन्य कोणताही लाभ घेतलेला नसावा.५ . उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु, ८ लाख पेक्षा कमी असावे, त्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.६ . उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष जास्तीत जास्त ६० वर्ष असणे आवश्यक. ७ . सदर प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.
लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:
वर नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणारे अर्जदार यांनी विहीत नमुन्यामध्ये अमृतच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्वाक्षांकित करून विहित मुदतीत अमृतच्या कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील.
लाभार्थी निवड प्रक्रिया :
अमृत व्दारा गठीत निवड समितीव्दारा लाभार्थी निवड करण्यात येईल.