You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

अमृत आयात-निर्यात प्रशिक्षण योजना

  • १ . हे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम कोठे राबविले जातील?

    • ➢ या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या विभागीय स्तरावर राबविले जातील.
  • २ . या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसायास मदत केली जाईल का?

    • ➢ या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या मार्फत २ वर्ष कालावधीपर्यंत पाठपुरावा करून सेवा, मदत व मार्गदर्शन पुरवण्यात येईल.
  • ३ . लाभार्थींना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल का?

    • ➢ या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही.
  • ४ . अमृत संस्थेमार्फत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

    • ➢ अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा पदवीधर असल्यास प्राधान्य. (किमान पदवीचे शिक्षण चालू असणे / तांत्रिक शिक्षण किंवा बारावी उत्तीर्ण अपेक्षित).
  • ५ . असेच प्रशिक्षण इतर संस्थांमध्ये घेतल्यास अमृतकडून लाभ मिळेल का ?

    • ➢ नाही
  • ६ . प्रशिक्षण पूर्ततेनंतर नोकरीसाठी अमृतचे सहाय्य मिळते का?

    • ➢ हे प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवार संबंधित क्षेत्रात नोकरी व उद्योग व्यवसाय करण्यास सक्षम व्हावेत, हि अपेक्षा आहे. या योजनेत नोकरी व उद्योग व्यवसायसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रयत्नशील असेल.
  • ७. प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम कोठे मिळेल?

    • ➢ प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.
  • ८ . या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वयोमर्यादा काय आहे?

    • ➢ या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराचे वय २१ ते ६० पेक्षा जास्त नसावे.
  • ९ . प्रशिक्षण स्थळापर्यंत पोहोचण्याचा व परतीचा प्रवासखर्च या योजनेत समाविष्ट आहे का?

    • ➢ नाही.
  • १०. या योजनेत ज्यांचेकडे शेती नाही त्यांना लाभ मिळेल का?

    • ➢ होय, अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील.

<